निवडणूक वृत्त

नागपूर नागरिक सहकारी बॅंक निवडणूक

जय सहकार पॅनेलचा दणदणीत विजय

मल्टीस्टेट दर्जा असलेली आघाडीची नागपूर नागरिक सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी नुकतीच पार पडली. त्यात विद्यमान जय सहकार पॅनलचे सर्व 17 उमेदवार प्रचंड मताधिक्क्यासह विजयी झाले व वर्तमान संचालक मंडळाने बॅंकेवरील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

पिंपरी चिंचवड बॅंकेच्या अध्यक्षपदी श्री. श्रीमंत शितोळेजी

पिंपरी चिंचवड सहकारी बॅंक लि., पुणेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध संपन्न झाली असून पहिल्या संचालक मंडळ सभेमध्ये सन 2010-11 या वर्षासाठी बॅंकेचे अध्यक्ष म्हणून श्री. श्रीमंत शितोळे यांची तर उपाध्याक्ष म्हणून सौ. निर्मला अशोकराव देशमुख यांची एकमताने निवड झाली.
श्री. अनिलराव गाडवे विश्वेश्वरच्या अध्यक्षपदी

संपूर्ण महाराष्ट्रांत सर्व प्रथम वार्षिक सर्व साधारण सभा घेणाऱ्या विश्वेश्वर सहकारी बॅंकेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळ सभेत श्री. अनिलराव गाढवे यांची अध्यक्षपदी तर श्री शरदराव गंजीवाले यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करणेत आली.
संपदा बॅंकेची निवडणूक बिनविरोध श्री. विवेकराव मठकरी अध्यक्षपदी

संपदा सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध संपन्न झाली.
संचालक मंडळाच्या पहिल्या सभेत सन 2010-11 या वर्षासाठी अध्यक्षपदी श्री. विवेकराव मठकरी यांची तर उपाध्यक्षपदी श्री. दिलीपराव नलावडे यांची एकमताने निवड झाली.
सर्व नूतन संचालकांचे तसेच सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांचे भावी कारकिर्दीत हार्दिक शुभेच्छा!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.