निवाडे

कर्जदार फॅक्टरी चालविण्यास असमर्थ असल्यास आणि कर्जाची परतफेड अशक्य दिसत असल्यास रिसिव्हर नेमणे योग्य.
(डीआरटी ऍक्ट 1993)
प्रिसायडिंग ऑफिसर डीआरटी यांनी ऍपेलन्ट सम्राट स्पिनर्स लि. ची संपत्ती जप्त करून लिलावाद्वारे विकून बॅंकेच्या खात्यात रक्कम जमा करण्याकरिता वसुली अधिकारी आणि रिसिव्हर नेमण्याचा आदेश दिला. या आदेशावर ही अपील दाखल करण्यात आली आहे. ऍपेलन्टच्या निवेदनानुसार, ऍपेलन्टची कारखाना चालविण्याची इच्छा आहे आणि तशी त्यास परवानगी देण्यात यावी. ही बाब बीआयएफआर समोर प्रलंबित आहे. बॅंकेच्या वकिलाच्या निवेदनानुसार, ऍपेलन्टने फॅक्टरी चालविण्याचा प्रयत्न केला नाही. रिसिव्हर नेमण्यापूर्वी ऍपेलन्टने फॅक्टरी बंद असल्याचे पत्र बॅंकेला दिले आहे. तसेच फॅक्टरीच्या संरक्षणाकरिता सुरक्षा गार्ड नेमण्याची मागणी ऍपेलन्टने केली होती.
ऍपेलन्टने आपल्या निवेदनात असे म्हटले की, आन्ध्र बॅंकेने स्वतः फॅक्टरी ताब्यात घेण्याबाबत असमर्थता व्यक्त केली होती. आन्ध्र बॅंकेने स्वतः ऍपेलन्टला आयडीबीआय बॅंकेशी संपर्क साधण्याचे पत्र दिले होते. त्यामुळे रिसिव्हर नेमण्याचा निर्णय अयोग्य आहे. ऍपेलन्टने बॅंकेशी केलेल्या पत्रव्यवहारावरून स्पष्ट होते की, ऍपेलन्ट फॅक्टरी चालविण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे आता ऍपेलन्टने फॅक्टरी चालविण्याची समर्थता व्यक्त करणे आणि त्यानंतर बॅंकेची रक्कम परत करण्याची इच्छा आणि समर्थता व्यक्त करणे निरुपयोगी ठरते. डीआरटीकडे बॅंकेने अर्ज सादर करण्यापूर्वी ऍपेलन्ट फॅक्टरी चालवत नव्हता. बॅंकेने डीआरटीकडे रिसिव्हर नेमण्याची मागणी केल्यामुळे ऍपेलन्टने असे निवेदन दिले आहे. बॅंकेला घेणे असलेली रकम रु. 8 कोटींपेक्षा अधिक आहे. त्यामुळे रक्कम वसुलीकरिता बॅंक सावध असली पाहिजे. या सर्व बाबींवरून ऍपेलन्ट फॅक्टरी चालवू शकत नाही, आणि इच्छुक नाही हे स्पष्ट होते. ऍपेलन्टची तशी स्थिती नाही. त्यामुळे प्रिसायडिंग ऑफिसर डीआरटी यांचा आदेश कायदेशीर आहे. ऍपेलेट ट्रॅब्युनलने अपील फेटाळले.
सम्राट स्पिनर्स वि. आन्ध्र बॅंक
I (2004) बीसी 18     डीआरएटी, चेन्नई


तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.