बँकिंग वृत्त

अर्जुन सह. बॅंकेची 14 वी वार्षिक सभा संपन्न
सोलापूर-अर्जुन अर्बन को-ऑप. बॅंक लि., सोलापूर या बॅंकेची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 11 ऑगस्ट 2010, रोजी बॅंकेचे चेअरमन श्री बलभीमसा रामचंद्रसा कोल्हापुरे यांच्या अध्यक्षतेखाली सहस्त्रार्जुन प्रशाला येथे खेळीमेळीच्या वातारवरणात पार पडली.
सभेच्या सुरुवातीस बॅंकेच्या वतीने संचालक श्री. ओमप्रकाश ज्ञानदेवसा बारड यांनी सर्व उपस्थित मान्यवर अतिथी आणि सभासदांचे स्वागत केले. त्यानंतर बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुनील छत्रबंद यांनी विषय पत्रिकेवरील विषय चर्चेला घेतला. प्रमुख अतिथी सर्वश्री ऍड. दत्तात्रयसा शंकरसा चव्हाण (अध्यक्ष, श्री सो.स.क्ष. समाज सेवा मंडळ ट्रस्ट), शंकरसा सुरेशसा कोल्हापुरे (चेअरमन, सहस्त्रार्जुन नागरी सहकारी पतपेढी), तसेच बाबुरावसा दत्तात्रयसा भुमकर (अध्यक्ष, श्री सो.स.क्ष. समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट), शिवप्रकाश अंबादास चव्हाण (संस्थापक चेअरमन, उमासा चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था), श्री विजयकुमारसा लक्ष्मणसा चौधरी आणि इतर ज्येष्ठ सभासद यांचा हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यांत आला.
अभ्युदय बँकेच्या नालासोपारा आणि अॅन्टॉप हिल येथील शाखांचे
उद्घाटन नुकतेच पार पडले.
बँकेचे अध्यक्ष आमदार सीताराम घनदाट यांनी तीन महिन्यांत बँकेच्या आणखी नऊ शाखा घडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली. चालू आथिर्क वर्षात १०० शाखांचे उद्दिष्ट्य पार पाडण्यात येणार आहे. बँकेने ७३०० कोटी च्चा व्यवसाय पूर्ण केला.
धनलक्ष्मी बँकेचे ३००० कोटींच्या ‘रिटेल कर्जाचे  उद्दिष्ट
खासगी क्षेत्रातील वेगाने विस्तारत असलेल्या धनलक्ष्मी बँकेने आता गृहकर्ज, वाहन कर्ज, कृषी आणि सोने व अन्य मालमत्ता तारण कर्ज अशा किरकोळ कर्ज वितरणावर भर देणारी मोहिम सुरू केली आहे. त्या पूर्वी सरलेल्या मार्चमध्ये कंपनीने आपला क्रेडिट कार्ड व्यवसाय सुरू केला होता. विद्यमान आर्थिक वर्षांअखेर या किरकोळ कर्ज वितरणाचा व्यवसाय ३,००० कोटींवर नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.  गेल्या काही वर्षांत बँकेने सुरू केलेल्या फेरबदलांचा रिटेल कर्ज व्यवसाय हा शेवटचा टप्पा असल्याचे धनलक्ष्मी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अमिताभ चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले. आजवर बडय़ा कॉर्पोरेट आणि लघु व मध्यम उद्योग अशा दोन विभागात कार्यरत असलेल्या धनलक्ष्मी बँकेचा रिटेल लोन्सचा हिस्सा आगामी दोन-तीन वर्षांत प्रत्येकी एक-तृतीयांश अशा समान स्तरावर येईल, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
धनलक्ष्मी बँकेच्या सध्याच्या कर्ज वितरणात बडय़ा कॉर्पोरेट समूहांचा हिस्सा जवळपास ६२ टक्के (रु. ४३०० कोटी) असून, त्या उलट जुलै २०१० अखेर रु. ५०० कोटींच्या घरात असलेले रिटले कर्ज वितरण हे बहुतांश गोल्ड लोन्स धाटणीचे आहे, अशी माहिती बँकेच्या रिटेल अ‍ॅसेट्स विभागाचे प्रमुख अरविंद हाली यांनी दिली.
येत्या काळात मात्र स्वयंरोजगारात असलेल्या व्यावसायिक व लघुउद्योजकांना कर्ज वितरणावर भर देत, अनेक प्रकारच्या किरकोळ कर्ज-योजनांची बँकेने घोषणा केली आहे. बँकेच्या देशव्यापी फैलावलेल्या २७१ शाखांच्या जाळ्याच्या माध्यमातून रिटेल कर्जाचे प्रमाण
सर्व बँकांनी बचत खातेधारकांना पासबुक देणे,
रिर्झव्ह बँकेने बंधनकारक केले आहे
काही बँका खातेधारकांना खात्याचे स्टेटमेन्ट देतात. परंतु, स्टेटमेन्टपेक्षा पासबुक हे वापरावयास सोपे व सुटसुटीत असल्याने सर्व बँकांनी बचत खातेधारकांना पासबुक देणे, रिर्झव्ह बँकेने बंधनकारक केले आहे. जर काही खातेधारकांनी स्टेटमेन्ट घेणे पसंत केल्यास बँकेने ते दर महिन्यास द्यावे. पासबुक वा स्टेटमेन्ट देण्यासाठी बँकांनी खातेदारास कोणतीही फी व चार्ज आकारू नये.
पासबुकातील नोंदी
अनेक बँकांच्या पासबुकातील नोंदी या अत्यंत त्रोटक असतात. उदाहरणार्थ ‘बायक्लिअरिंग’ किंवा ‘बायचेक’. तसेच इलेक्ट्रॉनिक क्लीअरिंगद्वारा जमा व वजा होणाऱ्या रकमांची योग्य माहिती लिहिलेली नसते. कित्येकदा फक्त काही नंबर लिहिलेले असतात. अशा गूढ नोंदींचा खातेदारांना अजिबात उलगडा होत नाही. खातेदारांनीची गैरसोय होऊ नये, म्हणून बँकेने अशा अगम्य नोंदी न करता, त्रोटक परंतु सोप्या व सहज समजतील अशा नोंदी कराव्यात, असे रिर्झव्ह बँकेने स्पष्ट बजावले आहे.
कुरिअरने चेकबुक पाठविणे
काही बँका खातेदारांकडून असे जबरदस्तीने लिहून घेतात की बँक आमच्या जोखमीवर चेकबुक कुरिअरने पाठवू शकेल. बँकांची ही कृती उचित नसल्याचे रिर्झव्ह बँकेने म्हटले आहे. बँकेने असे खातेदारांकडून लिहून घेऊ नये व खातेदाराने विनंती केल्यास त्याला त्याने परवानगी दिलेल्या त्याच्या प्रतिनिधीस चेकबुक बँकेतच देण्यात यावे.
मुदत ठेवींचा मुदतपूतीर्नंतर विनियोग
मुदतीनंतर ठेवींचा विनियोग कसा करावा, या संबंधीची सूचना ठेव ठेवतेवेळी अर्जामध्येच घ्यावी. अशी सूचना घेतली नसेल तर मुदत पूतीर्पूवीर् मुदत संपण्याच्या तारखेची आगाऊ सूचना ठेवीदारांना देणे हे बँकांवर बंधनकारक आहे. तत्पर व दजेर्दार ग्राहक सेवेचे हे लक्षण आहे, असे रिर्झव्ह बँकेने म्हटले आहे.
मुदतीपूवीर् पैसे काढणे
ठेवीदाराने विनंती केल्यास बँकांनी ठेवीदारास मुदतीपूवीर् पैसे परत करावयास हवे. असे पैसे परत करताना जेवढ्या कालावधीसाठी पैसे बँकेकडे राहिले असतील, त्या कालावधीसाठी जो व्याजाचा दर लागू असेल, त्या व्याजदराने व्याज दिले जाईल. अशावेळी दंड स्वरूपाचा जो दर लावायचा असेल तो दर ठरविण्याचे स्वातंत्र्य बँकांना देण्यात आले आहे. परंतु, काही किमान कालावधीसाठी ठेव ठेवण्याचे ठेवीदाराने मान्य केले असेल तर असा कालावधी संपेपर्यंत ठेव परत मिळणार नाही. तसेच दंड स्वरूपाचा दर ठेवी ठेवतानाच ठेवीदारांना सांगण्याचे बंधन बँकांनी पाळावयास हवे. व्यक्ती वा एचयूएफ वगळता अन्य ठेवीदारांकडून स्वीकारलेली मुदतठेव मुदतीपूवीर् परत करण्याचा वा न करण्याचा अधिकार बँकांना देण्यात आला आहे. परंतु, अशी ठेव परत न करण्याच्या बँकेच्या धोरणाची आगाऊ सूचना ठेवीदारास ठेव ठेवतेवेळी देण्यात यावी.
बँकिंग सेवेचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रिर्झव्ह बँकेच्या सूचना
भारतीय रिर्झव्ह बँकेने बँकिंग सेवेचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच बँकांचा व्यवहार पारदर्शक व्हावा या दृष्टीने अलीकडे एक परिपत्र
क काढून बँकांना काही सूचना केल्या आहेत. या सूचना नेमक्या काय आहेत,
ग्राहकांना आथिर्क सेवा पुरविण्यात बँकिंग क्षेत्राचा फार मोठा वाटा आहे. ग्रामीण भागात व अगदी तळागाळातील व्यक्तीलाही बँकिंग सेवा मिळावी, असे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्राचा विस्तारही दिवसेंदिवस वाढत आहे. ही सेवा चांगल्या दर्जाची व तत्पर असावी याकडे भारतीय रिर्झव्ह बँकही विशेष लक्ष पुरवित असते. ठेवीदार हा बँक व्यवसायाचे सर्वांत महत्त्वाचे अंग असून त्याचे सबलीकरण व्हावयास हवे असे, रिर्झव्ह बँकेस वाटते. ग्राहकसेवा अधिकाधिक दजेर्दार व्हावी म्हणून रिर्झव्ह बँक वेळोवेळी उपाय योजून त्याची अंमलबजावणी करण्यास बँकांना आदेश देत असते. ग्राहक सेवेसंबंधी रिर्झव्ह बँकांना अनेक बाबतीत मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली असून त्यांच्या अंमलबजावणीचे बंधन बँकांवर आहे.
बँकांची जागा व मूलभूत सुविधा
मोठ्या शाखांमध्ये स्वागत कक्षाशिवाय चौकशीसाठी स्वतंत्र व्यक्तीची नेमणूक करावी. निवृत्तीवेतनधारक, विरिष्ठ नागरिक, अपंग व्यक्तीकडे विशेष लक्ष पुरवावे. सूचना फलक हे इंग्रजी, हिंदी व स्थानिक भाषेत असावेत. बँक कर्मचाऱ्यांनी आपले नाव व फोटो असलेले परिचय पत्र जवळ बाळगावयास हवे. ग्राहकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोयही उपलब्ध असावी.
शाखानिहाय ग्राहकसेवा समित्या
प्रत्येक बँकेने आपल्या शाखांना ग्राहक सेवा समिती स्थापन करण्यास सांगून त्यामध्ये ग्राहकांचाही समावेश असावा, असे रिर्झव्ह बँकेने म्हटले आहे. त्यातही प्राधान्याने वरिष्ट नागरिकांचा समावेश करावा. या समितीची महिन्यातून कमीत कमी एक बैठक व्हावी, त्यामध्ये ग्राहकांच्या अडचणींचा विचार व्हावा. समितीने ग्राहकसेवा स्थायी समितीला आपला अहवाल द्यावा.
ग्राहकांना द्यावयाच्या नुकसानभरपाईचे धोरण
प्रत्येक बँकेने आपल्या संचालक मंडळाच्या मंजुरीने ग्राहकांना द्यावयाच्या नुकसान भरपाईचे धोरण ठरवून ते लिखित स्वरूपात ठेवावयास हवे. त्यामध्ये बँकेने चेक क्लीअरिंगला उशीर झाल्यास द्यावयाचे व्याज, डुप्लिकेट ड्राफ्ट द्यावयास उशीर झाल्यास द्यावयाचे व्याज, ग्राहकाच्या फ्रॉड व अन्य कारणाने रक्कम वजा करणे व योग्य मंजुरीशिवाय बँकेने केलेल्या कृतीमुळे ग्राहकाचे झालेले आथिर्क नुकसान या कमीतकमी बाबींचा उहापोह करावयास हवा. ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठीही बँकेने लिखित स्वरूपात धोरण ठरवावयास हवे. या सर्व धोरणांना योग्य प्रसिद्धी द्यावी, असेही रिर्झव्ह बँकेने म्हटले आहे.
त्रिभाषा सूत्र
बँकिंग सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचाव्यात यासाठी ‘अकाऊन्ट ओपनिंग फॉर्म’, पासबुक, पे इन स्लिप्स, या इंग्रजी, हिंदी व स्थानिक भाषेत असाव्यात याची जबाबदारी प्रत्येक बँकेवर टाकण्यात आली आहे.
डिपॉझिट खाते उघडणे
सर्व प्रकारच्या डिपॉझिट खात्यांसाठी प्रत्येक खातेदाराचे फोटो घेणे हे बँकांवर बंधनकारक आहे. फोटोऐवजी ‘ड्राइव्हिंग लायसन्स’ वा ‘पासपोर्ट’ची कॉपी घेणे पुरेसे नाही. बँकांनीही रिर्झव्ह बँकेच्या नियमानुसार प्रत्येक खात्यासाठी स्वतंत्र फोटो मागू नयेत. प्रत्येक खात्याच्या अर्जावर फोटो घेतलेल्या खात्याचा योग्य उल्लेख करावा. बचत व चालू खात्यात फक्त जे खातेधारक खात्यात व्यवहार करणार असतील, त्यांचाच फोटो घेण्यात यावा. काही बँका सेल्फ अथवा बेअरर चेकचे पैसे देण्यासाठीही स्वत: खातेदाराने प्रत्यक्ष यावे, असा आग्रह धरतात. परंतु, असा आग्रह बँकांनी धरू नये, मात्र योग्य ती सावधगिरी बाळगून, अशा चेकचे पैसे द्यावेत, असे रिर्झव्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
किमान शिल्लक
खाते उघडायच्या वेळीच बँकेने पारदर्शक पद्धतीने खात्यात नेहमी कमीत कमी किती रक्कम ठेवणे आवश्यक आहे, ते सांगावयास हवे. त्याचबरोबर अशी रक्कम न ठेवल्यास किती रक्कम दंड स्वरूपात भरावी लागेल, हेही सांगावयास हवे. ‘मिनिमम बॅलन्स’ व ‘दंड रक्कम’ यात बँकेस काही बदल करावयाचे असल्यास खातेदारास त्यांची कमित कमी एक महिना अगोदर सूचना द्यावयास हवी. बँक व खातेदार अशा दोघानीही रिर्झव्ह बँकेच्या नियमांचा व्यवहार्य दृष्टिकोनातून विचार करून परस्परांचे हित जपावे, हे दोघांच्याही हिताचे आहे. सर्वसामान्यांसाठी बँकिंग सेवा ही संकल्पना रुजविण्याचा हाच एक मार्ग आहे.
शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँकेस १४ शाखा उघडण्यास परवानगी
शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँकेस १४ शाखा उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. डिसेंबर २०१० अखेरपर्यंत एकूण १०० शाखा आणि १० हजार कोटी रुपयांचा व्यवसाय असे दुहेरी ध्येय साध्य करण्याकडे वाटचाल करण्यात येत आहे, असे अध्यक्ष एन. एस. राव यांनी बँकेच्या वाषिर्क सभेत सांगितले. आतापर्यंत बँकेचा एकूण व्यवसाय ९०२५ कोटी रुपये झालेला असून सात राज्यांमध्ये मिळून ९१ शाखांद्वारे बँक कार्य करीत आहे. मार्चअखेर ६० कोटी रुपये निव्वळ नफा कमवाला आहे. मागील वषीर् २१ कोटी रुपये नफा झाला होता. सभेत व्यासपीठावर उपाध्यक्ष सुरेश हेमाडी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास जोशी प्रभृती उपस्थित होते.
ठेवींवरील व्याजदरात वाढ

अनेक बँकांचे निर्णय
* ठेवीदारांना फायदा
* ठेवीसंकलनाची जोरदार स्पर्धा
* अँक्सिस, युनियन, ‘बीओआय’ची लवकरच दरवाढ
कॉपोर्रेशन बँकेने जून २०१० अखेर संपलेल्या तिमाहीत ३३३ कोटी ७८ लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला. मागील याच काळाच्या तुलनेने हा नफा सुमारे २८ टक्क्यांनी अधिक आहे. बँकेच्या व्यवसायात ३० टक्क्यांनी म्हणजे ३६ हजार ३३५ कोटी रुपयांची भर पडली. ठेवी ७२ हजार कोटी रुपयांवरून ९१ हजार कोटी रुपये अशा झाल्या. कर्जवाटप ६४ हजार कोटी रुपयांचे झाले. एकूण ३६ टक्क्यांनी वाढ झाली. निव्वळ एनपीए ०.३२ टक्क्यांवरून ०.४३ टक्के असे झाले.
एचडीएफसी बँकेपाठोपाठ खासगी क्षेत्रातील कोटक महिंद बँकेने एक वर्ष मुदतीपर्यंतच्या ठेवींवरील व्याजदरांत पाव टक्का वाढ केली असून, इतर बँकाही ठेवी आकषिर्त करण्यासाठी व्याजदर वाढविण्याची शक्यता आहे.
‘कोटक’च्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय रिर्झव्ह बँकेने ‘रेपो’ दरांत वाढीची घोषणा केल्यानंतर याच आठवड्यात एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर बँकेने ही पाव टक्क्याची वाढ केली आहे. व्याजदरांत आणखी वाढ करण्याबाबत वित्तीय बाजारातील कलांचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल.
एचडीएफसी बँक, लक्ष्मीविलास बँक या खासगी आणि सरकारी क्षेत्रातील सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांनी याआधीच ठेवींवरील व्याजदरांत वाढ जाहीर केली आहे. येत्या काही दिवसांत खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँक व युनियन बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ इंडिया (‘बीओआय’) या सरकारी बँका त्यांच्या ठेवींवरील व्याजदरांमध्ये पाव ते अर्धा टक्का वाढ लवकरच करण्याची शक्यता आहे. या बँकांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमच्या ‘अॅसेट-लायबिलिटी कमिटीज’च्या बैठका येत्या काही दिवसांत होत असून, त्यात विविध मुदतींच्या ठेवींवरील व्याजदरांमध्ये वाढ करण्याबाबत निर्णय होतील. बँकिंग उद्योगातील हालचालींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.
जीवनावश्यक व इतरही वस्तूंच्या बेसुमार भाववाढीला आळा घालण्यासाठी चलनपुरवठा कपातीचा उपाय म्हणून रिर्झव्ह बँकेने गेल्या २७ जुलै रोजी बँकांसाठी असलेला ‘रेपो’ हा अल्पकालीन व्याजदर पाव टक्क्याने वाढवून ५.७५ टक्क्यांवर आणि ‘रिव्हर्स रेपो’ दर अर्ध्या टक्क्याने वाढवून ४.५ टक्क्यांवर आणला आहे. रिर्झव्ह बँकेच्या या कृतिमुळे बँकांकडील रोखता (‘लिक्विडिटी’) कमी होणार असून, त्यामुळे त्यांना ठेवी व कर्जांवरील व्याजदरांत वाढ करणे भाग पडणार आहे. घाऊक किंमत निदेर्शांक (‘होलसेल प्राइस बेसड इन्फ्लेशन’)
जूनमध्ये १०.६ टक्क्यांवर होता. फेब्रुवारी २०१० पासून तो सतत दोन आकडीच राहिलेला आहे.
सेंट्रल बँकेची सेंटफास्ट इंडिया सेवा

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने अमेरिकेतून भारतात ऑनलाइन पैसे पाठविण्यासाठी सेंटफास्ट२इंडिया सेवा सुरू केली आहे.
बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस. श्रीधर यांनी या सेवेची माहिती देताना सांगितले की, अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना या सेवेद्वारे मायदेशी झटपट पैसे पाठविणे शक्य होणार आहे. अमेरिकेत कोठेही राहणारे भारतात कोणत्याही बँकशाखेत आपल्या सोयीनुसार पैसे पाठवू शकतात. सध्या कमाल पाच हजार डॉलर या सुविधेद्वारे पाठविता येतील.
परदेशांत राहणारे भारतीय वर्षाला सुमारे ५५०० कोटी डॉलर भारतात पाठवित असतात. २०१४ सालापर्यंत ही रक्कम १० हजार कोटी रुपयापर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे, असा दावाही त्यांनी केला.
बँकेने यावषीर् नवीन योजना जाहीर करताना रिटेल व्यवसायावर अधिक लक्ष केंदित करण्याचे ठरविले आहे. गतवषीर् कॉपोर्रेट क्षेत्रासाठी योजना आखण्यात आल्या होत्या. यावषीर् रिटेल व्यवसायात २५ टक्के वृद्धी अपेक्षित आहे. गतवषीर् २० टक्के वाढ झाली होती.
देशात 32 सहकारी बॅंका बंद

नवी दिल्ली-देशात डिसेंबर 2009 अखेर संपलेल्या वर्षात 32 सहकारी बॅंका बंद पडल्या. यामध्ये महाराष्ट्रातील 15, कर्नाटकामधील 7, गुजरातमधील 5 तर उत्तर प्रदेशातील तीन बॅंकांचा समावेश आहे.

2008 साली 17 सहकारी बॅंका बंद पडल्या होत्या. डिपॉझिट इन्शुरन्स ऍण्ड क्रेडिट गॅरन्टी कॉर्पोरेशनला या बॅंकांच्या ठेवीदारांना 482 कोटी रूपयांचे वाटप करणे भाग पडले. प्रत्येक ठेवीदारास ठेवी विमा नियमानुसार कमाल 1 लाख रूपये देण्यात आले.

सांगली येथील वसंतदादा शेतकरी बॅंकेने 159 कोटी 93 लाख रूपयांचे वाटप केले. त्यानंतरचा क्रम पी.के. अण्णा पाटील जनता बॅंकेचा लागतो. या बॅंकेने 56 कोटी 48 लाख रूपये परत केले. साऊथ इंडियन को-ऑपरेटिव्ह बॅंकेने 35 कोटी 40 लाख रूपये ठेविदारांना दिले. रोहे अष्टमी सहकारी बॅंकेने 25 कोटी 72 लाख रूपये ठेवीदारांना दिले. भावनगर मर्कन्टाईल को-ऑपरेटिव्ह बॅंकेने 24 कोटी 52 लाख रूपये तर चाळीसगाव को-ऑपरेटिव्ह बॅंकेने 14 कोटी 97 लाख रूपयांचे ठेवीदारांना परत केले.

सुभाष देशमुख यांच्या हाती लोकमंगल बॅंकेची सत्ता

सोलापूर-येथील लोकमंगल सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सुभाष देशमुख यांच्या पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. सत्ताधरी पॅनलच्या उमेदवारांना अठराशेच्या तर विरोधकांना अडीचशेच्या दरम्यान मते मिळाली.

पिंपळगाव मर्चंट बॅंकेच्या द्वारका शाखेचा शुभारंभ

पिंपळगाव मर्चटस को-ऑपरेटिव्ह बॅंकेची द्वारका नाशिक येथे अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सातवी शाखा बॅंकेचे विद्यमान चेअरमन सुमतीलाल सुराणा यांनी सपत्नीक पूजन करून कार्यान्वित करण्यात आली.

राजलक्ष्मी बॅंकला 60.60 लाख नफा

नाशिकमधील राजलक्ष्मी बॅंकेने मार्च 2010 अखेर उल्लेखनीय प्रगती केली असून सर्व प्रकारची उद्दिष्ठ्ये पूर्ण केली आहेत, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष व माजी आरोग्य मंत्री डॉ. दौलतराव आहेर यांनी दिली.

बॅंकेच्या भागभांडवलात 58% वाढ झाली असून मार्च अखेर 2 कोटी 72 लाख भाग भांडवल झाले आहे. इतर निधीमध्ये 35% वाढ झाली असून मार्च अखेर ठेवी 52 कोटी 44 लाख झाल्या आहेत. कर्ज वाटपामध्ये 50% वाढ झाली असून मार्च अखेर 34 कोटी 46 लाख कर्ज आहेत. बॅंकेने 19 कोटी 59 लाखांची गुंतवणूक केली आहे. चालू वर्षात चांगल्या प्रकारे कर्जवसुली केल्यामुळे बॅंकेचे एन.पी.ए. चे प्रमाण एक टक्क्यांवर आले आहे. बॅंकेस चालू आर्थिक वर्षात रू. 60.60 लाख नफा झाला असून बॅंकेने रिर्झव्ह बॅंकेच्या निर्देशानुसार सर्व प्रकारच्या तरतुदी करून व इन्कम टॅक्सचा भरणा करून देखील रू. 28 लाख 38 हजारांचा निव्वळ नफा झाला आहे.

अमेरिकेतील 73 बॅंकांना पाच महिन्यांत टाळे

न्यू यॉर्क: गेल्या वर्षी आलेले जागतिक आर्थिक संकटाचे भूत अमेरिकेच्या मनगुटावरून अद्यापही उतरले नसून, गेल्या पाच महिन्यांत अमेरिकेतील 73 बॅंकांना टाळे लागले आहे.

येथे काही दिवसांत आणखी काही बॅंका बंद पडू शकतील, असा इशारा फेडरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनने दिला आहे. अमेरिकेतील बॅंका बंद पडण्याची सरासरी महिल्याला 14 आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या बॅंकांचा आकडा 775 वर पोहोचला आहे.

मागील 17 वर्षांतील हा उच्चांक आहे. 2009 पर्यंत संकटात असलेल्या बॅंकांची संख्या 702 इतकी होती. केवळ मे महिन्यातच 9 बॅंका बुडाल्या आहेत. एफडीआयसीच्या अवहालानुसार 2010 च्या पहिल्या तिमाहीत 41 बॅंका बंद झाल्या तर एप्रिलमध्ये 23 बॅंका बंद झाल्या.

नोकऱ्या गेल्यामुळे किंवा बेरोजगारी वाढल्यामुळे घेतलेले कर्ज फेडले गेले नाही. त्यामुळे अमेरिकेतील बॅंका कोलमडल्या असल्याचे तज्ञांचे मत आहे.

चिपळूण अर्बन बॅंकेतर्फे 10 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

माध्यमिक शालांत परीक्षेत 95 टक्केच्यावर गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ चिपळूण अर्बन बॅंकेच्या वतीने नुकताच करण्यात आला. या समारंभामध्ये विविध शाळांमधील पंधरा विद्यार्थ्यांना भेटवस्तु देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे संचालक व कर्मचाऱ्यांच्या मुलामुलींचाही 80 टक्केच्यावर गुण मिळविलेल्या सत्कार यावेळी करण्यात आला.

बॅंकेचे ज्येष्ठ संचालक श्री. सतीशशेठ खेडेकर यांनी प्रास्ताविक केले. यानंतर बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष श्री संजयशेठ रेडिज यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

गेली 76 वर्षे बॅंक चिपळूणच्या लोकांचे उत्कर्षासाठी झटत आहे.

शिवाजी बॅंके तर्फे ‘माझा कॉम्प्युटर’ कर्ज योजना कार्यन्वित

वार्षिक अठराशे कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल असलेल्या व 32 हजार ग्राहक सभासदांना दर्जेदार बॅंकिंग सेवा देणाऱ्या पैठण येथील शिवाजी नागरी सहकारी बॅंकेच्या वतीने माझा कॉम्पयूटर ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून त्यासाठी शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती या बॅंकेचे मुख्य अधिकारी एजाज पठाण यांनी दिली आहे.

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बॅंकेला 93 लाखांचा नफा

नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बॅंकेस मार्च 2010 अखेरीस 93.30 लाखाचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष निवृत्ती सानप व उपाध्याक्षा प्रतिभाताई गोवर्धने यांनी दिली.

चालू आर्थिक वर्षामध्ये बॅंकेला वर्षाच्या प्रारंभीच रिझर्व्ह बॅंकेकडून परवाना प्राप्त झाला. बॅंकेच्या ठेवी 43 कोटींच्या वर व निव्वळ एनपीए शून्य टक्क्यापर्यंत आणण्यात बॅंकेला यश प्राप्त झाले. अनेक वर्षापासून सभासदांमधून होत असलेल्या मागणीनुसार नियमित कर्जाची कमाल मर्यादी 1 लाखावरून 1.50 (दीड) लाखापर्यंत केली असून प्रत्यक्ष कार्यवाही 1 मे 2010 पासून होणार आहे.

ठाणे जनता सहकारी बॅंकेच्या पन्नासाव्या शाखेचे उद्‌घाटन

अवघ्या 38 वर्षांच्या काळात शाखांचे अर्धशतक गाठणाऱ्या ठाणे जनता सहकारी बॅंकेने रामनवमीच्या शुभमुहूर्तावर कल्याण शहरात पन्नासाव्या शाखेचे उद्‌घाटन करून एक आगळा योग साधला आहे. ख्यातकीर्त संगणकतज्ज्ञ व साहित्यिक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते कल्याणच्या शाखेचे उद्‌घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून व्हीआयपी ग्रुप इंडस्ट्रीजचे जयकुमार पाठारे उपसिथत होते.

राजलक्ष्मी बॅंकेमार्फत कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळा

नाशिक येथील राजलक्ष्मी बॅंकेने मोमेंटम संस्थेच्या सहकार्याने एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.

या शिबिरास बॅंकेचे सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेच्या सुरुवातीस बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक भाबड यांनी प्रास्ताविक करून बॅंकेच्या मार्च 2010 अखेरच्या प्रगतीचा आढावा घेतला. आणि मागील वर्षातील उद्दिष्टांची पूर्तता झाल्याचे नमूद केले.

श्री समर्थ सहकारी बॅंकेस 1 कोटी 85 लाखांचा नफा

नाशिक येथील श्री समर्थ सहकारी बॅंकेस मार्च 2010 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाअखेरीस 1 कोटी 85 लाख 4 हजार रू. इतका नफा झाला आहे, अशी माहिती बॅंकेचे चेअरमन मधुकरराव  कुलकर्णी यांनी दिली. बॅंक स्थापन झाल्यापासून हा सर्वाधिक नफा आहे. बॅंकेच्या ठेवी 88 कोटी 81 लाख 78 हजार रुपये आहेत. गतवर्षी 2008-09 अखेर ठेवी 73 कोटी 84 लाख 89 हजार रुपये होत्या. बॅंकेने या आर्थिक वर्षात 48 कोटी 13 लाख 72 हजार रुपयाचे कर्ज वितरित केले. बॅंके कडे 48 कोटी 43 लाख 63 हजार रुपये गुंतवणूक आहे तर खेळते भांडवल 1 अब्ज 5 कोटी  77 लाख 99 हजार रुपये आहे. बॅंकेचे एनपीए 1.19 टक्के असून, 1 कोटी 85 लाख 44 हजार रुपये इतका नफा झाला आहे.

मामको बॅंक सभासदांचा एक लाखाचा अपघात विमा
मालेगाव मर्चन्टस्‌ को-ऑप. बॅंकेच्या सभासदांसाठी 2010-11 करिता 1 लाख रुपयांचा अपघात विमा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी तर्फे उतरविण्यात आला आहे.

जागतिक बॅंकेत भारताची ‘पत’ वाढली
नवी दिल्ली- जागतिक बॅंकेच्या विकास समितीची बैठक 25 एप्रिलला वॉशिंग्टनमध्ये झाली. या बैठकीत बॅंकेची आर्थिक क्षमता आणि ती वाढविण्यासाठी विकसनशील देशांची भूमिका वाढविणारे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे भारताला मोठा फायदा होणार आहे.
बॅंकेच्या भागिदारी संरचनेत बदलामुळे भारताला बॅंकेच्या महत्त्वाच्या भागीदारांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे भारत आता जागतिक बॅंकेमध्ये सातव्या क्रंमाकाचा सर्वात मोठा भागीदार बनणार आहे. या शिवाय वैश्विक आर्थिक बदलांमुळे भारत, चीन, ब्राझिल, इंडोनेशिया, मेक्सिको आणि तुर्कीसारख्या देशांची मतदान क्षमताही वाढणार आहे. आतापर्यंत काही प्रमुख युरापीय आणि अन्य देश जसे ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जापान, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाचा आंतराष्ट्रीय आर्थिक स्थितीवर दबदबा कायम होता, तो आता कमी होणार आहे.
या बदलामुळे रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इटली आणि सौदी अरेबियाच्या तुलनेत भारताची मतदान क्षमता जास्त असणार आहे.
गेल्या दशकातील भारताची वेगवान प्रगती आणि इतर देशांच्या तुलनेत भारताची आर्थिक ताकद या बदलांमुळे समोर येत आहे. जसजशी भारताची आर्थिक क्षमता वाढेल, तसतशी जागतिक बॅंकेत भारताची भूमिका महत्त्वाची होईल.

दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप. बॅंक सदैव तत्पर-खा. गोपीनाथ मुंडे
दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप. बॅंक ठेविदारांबरोबरच नवीन तरुणांना त्यांच्या पायावर उभे राहून व्यापार करण्याकरिता तत्पर आहे, असे प्रतिपादन खा. गोपीनाथ मुंडे यांनी वैद्यनाथ बॅंकेच्या अहमदपूर शाखेच्या उद्‌घाटनप्रसंगी केले.

गोदावरी अर्बन बॅंकेस 34.24 लाखांचा नफा
नाशिक येथील गोदावरी अर्बन बॅंक  को-ऑप. बॅंकेला 31 मार्च 2010 अखेर आर्थिक रु. 34.24 लाखांचा नफा झाला असून बॅंकेने रु. 44.16 लाख आयकर व रु. 70 लाख बुडीत कर्ज निधीची तरतूद केलेली असल्याची माहिती बॅंकेच्या अध्यक्षा सौ. निलिमाताई वसंतराव पवार यांनी दिली.

राजारामबापू सहकारी बॅंकेला 6.51 कोटी नफा
सांगली जिल्ह्यातील पेठ (ता. वाळवा) येथील राजारामबापू सहकारी बॅंकेने 31 मार्च 2010 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 6 कोटी 51 लाख रु. निव्वळ नफा कमावला आहे.
बॅंकेची निव्वळ थकित कर्जे (नेट एनपीए) शून्य टक्के आहेत. बॅंकेचे अध्यक्ष प्रा. शामराव  पाटील यांनी ही माहिती देताना सांगितले की, गेल्या वर्षात बॅंकेच्या ठेवी 603.85 कोटी रुपये झाल्या असून, कर्जव्यवहार 295.72 कोटी इतका झाला आहे. राज्यातील फारच थोड्या नागरी सहकारी बॅंकांचा एनपीए शून्य टक्के असून त्यात राजारामबापू सहकारी बॅंकेचा समावेश आहे. प्रति कर्मचारी व्यवसाय 3.19 कोटीवर पोहोचला आहे.

दीनदयाळ नागरी सहकारी बॅंकेस रू. 67.29 लाख नफा
अंबाजोगाई येथील दीनदयाळ नागरी सहकारी बॅंकेने मार्च 2010 अखेर रू. 67.29 लाख (करपूर्व) नफा मिळविल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष डॉ. दि.ज.दंडे उपाध्यक्ष प्रा. किरण फडणीस यांनी  दिली आहे.
बॅंकेची मार्च 2010  अखेरची लेखापरिक्षण पूर्व सांपत्तिक स्थिती ही खरोखरच समाधान कारक असून मार्च 2010 अखेर बॅंकेकडे रु. 7084.77 लाख एवढ्या ठेवी संकलित केल्या असून गत वर्षीपेक्षा यामध्ये रु. 1764.21 लाखांची लक्षणीय वाढ झाली आहे. त्याप्रमाणे कर्ज रु. 3831.83 लाख (545.94 लाख), गुंतवणूक रु. 3012 लाख (492.35 लाख) राखीव निधी रु. 427.12 लाख (49.50) खेळते भांडवळ 8095.25 लाख (1874.61 लाख) (कंसातील आकडे हे गतवर्षी पेक्षा वाढ झाली रक्कम) बॅंकेचे ढोबळ अनुत्पादक कर्जाचे एकूण कर्जाशी प्रमाण हे 7.18 टक्के असून निव्वळ अनुत्पादक कर्जाचे प्रमाण हे 5.13 टक्के एवढे आहे.

व्यापारी बॅंक उपनगर शाखेचे स्वमालकीच्या जागेत स्थलांतर
देवळाली व्यापारी बॅंकेच्या उपनगर शाखेचा स्वमालकीच्या जागेत उद्‌घाटन सोहळा ह.भ.प. गबाजी बाबा गायकवाड यांच्या हस्ते व बॅंकेचे संस्थापक संचालक मधुसुदन दंडे (सराफ) यांच्या अध्यक्षतेखाली व महापौर सौ.नयना घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

बिझनेस बॅंकेचा वर्धापनदिन उत्साहात
नाशिकरोड येथील बिझनेस को-ऑप. बॅंकेच्या वर्धापनदिनी महापौर नयना घोलप यांच्या हस्ते सुवर्ण संचय योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

हिंदुजा समूह युरोपातील बॅंक घेणार
हिंदुजा समूह युरोपातील खासगी क्षेत्रातील केबीएल पीपीबी ही बॅंक ताब्यात घेणार आहे. हा व्यवहार 1.35 अब्ज युरोना( सुमारे 8770 कोटी रुपये) होणार असून, बेल्जियमच्या केबीसी ग्रुपची  केबीएल इपीबी ही उपकंपनी आहे, असे हिंदुजा समूहाने जाहीर केले.
युरोपातील ही एक मोठी बॅंक असून, युरोपातील 10 देशांत या बॅंकेचा विस्तार 55 ठिकाणी झाला आहे. ही बॅंक वैयक्तिक सेवा, मालमत्ता व्यवस्थापन आणि श्रीमंत ग्राहकांना सेवा देते. या व्यवहाराचा हिस्सा म्हणून हिंदुजा समूह केबीसी च्या उपकंपनीत सर्व हिस्सा तसेच उपकंपनीच्या उपकंपन्या, आयुर्विमा व्यवसाय ताब्यात घेणार आहे. केबीएल सध्या 47 अब्ज युरोपचे मालमत्ता व्यवस्थापन करीत आहे. या व्यवहारास वैधानिक मान्यता मिळणे बाकी असून, 2010 च्या तिसऱ्या तिमाहीत व्यवहार पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया दोन्ही कंपन्यांनी दिली.

कल्लाप्पाण्णा आवाडे बॅंकेच्या तीन शाखांना अनुमती
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी  बॅंकेस, नवीन तीन शाखा व फ्रॅंकिंग सुविधा सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. अशी माहिती चेअरमन अशोक सौदत्तीकर यांनी दिली.
रिझर्व्ह बॅंकेकडून लातूर, कागल आणि शहापूर, इचलकरंजी या तीन नव्या शाखांना अनुमती मिळाली. तसेच दत्ताजीराव कदम टेक्सटाईल व इंजिनीअरिंग कॉलेज, इचलकरंजी येथे ऑफ साईट एटीएम सुरू करण्यासाठी संमती मिळाली आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.