महाराष्ट्रभर नागरी बॅंका, पतसंस्था या आपले बॅंकिंग व्यवहार नीट पार पाडत असतानाही काही चांगले सामाजिक उपक्रम राबवित असतात. काही सेवाभावी प्रकल्प चालवितात तर कधी अशा संस्थांना/कार्यकत्यांना आपल्या नफ्यातून दरवर्षी नेमाने काही रक्कम देऊन त्यांच्या कार्यात आपला वाटा उचलत असतात, त्यांचा उत्साह आणि चांगले कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी समाज असतो, ही त्यांची श्रद्धा बळकट करीत असतात. नागरी बॅंक/पतसंस्था यांचे हे सामाजिक कार्य सर्वांना माहीत व्हावे, म्हणून त्यांच्या या कार्याला येथे प्रसिद्धी दिली जाईल. तसेच नागरी बॅंक आणि नागरी पतसंस्था आणि कर्मचारी पतसंस्था या तीन गटात सर्वोत्तम करणाऱ्या संस्थांना पुरस्कार व गौरवपत्र देण्यात येईल. तरी संस्थांनी मागील आर्थिक वर्षातील आपले सामाजिक उपक्रम/सेवाभाव प्रकल्प आणि आर्थिक मदत यांची माहिती छायाचित्रासह आमच्याकडे पाठवावी. या संदर्भ खुलाशासाठी 9225210130 वर संपर्क करावा.
Filed under: Uncategorized